Monday, March 11, 2019

यशवंतराव चव्हाण,वारणा महाविद्यालय , वारणानगर येथे जागतिक महिला दिन साजरा

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कोल्हापूर ,वुई केअर सोशल फौंडेशन , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .
        स्त्रियांच्या मूलभूत हक्कांच्या जाणीव आणि जागृतीसाठी 8 मार्च हा जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला . याद्वारे स्त्रियांचे प्रश्न जागतिक पटलावर उपस्थित केले गेले . चूल आणि मुल या पुरत्या मर्यादित असणाऱ्या स्त्रिया आता विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करत आहेत . जगभर विविध कार्यक्रम व उपक्रम याद्वारे जागतिक महिला दिन साजरा केला जातो . याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते .
         कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रजवलन करून करण्यात आले,यावेळी महिला दिनाबाबत बोलताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या शहरसचिव आरती रेडकर म्हणाल्या ," सावित्री व जिजाबाई यांचे विचार खूप प्रगत होते . ते आचरणात आणण्याची गरज आहे ." यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता अमृता जोशी - साळुंखे म्हणाल्या , " समाजातील स्त्रियांचा सामाजिक दर्जा  उंचवायचा असेल तर सामजिक स्वास्थ चांगले ठेवणे अत्यंत गरजेचे आहे ."महिला दिन साजरा करताना फक्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या म्हणजे झालं का? तर जडण-घडणीस आपण समाज म्हणून काय तर करणे गरजेचे आहे.खूप सारे प्रश्न आहेत त्यावर आध्याप ही मार्ग निघाले नाहीत.त्यावर चिकित्सा होणे फार गरजेचे आहे.नुसते धार्मिक,सामाजिक,राजकीय स्वातंत्र मिळाले तर सगळे प्रश्न सुटतील का??असे अनेक प्रश्न आजून ही निरुत्तर आहेत.
          यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . शहापूरे होत्या .  वुई केअर सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सुदर्शन पांढरे , सलमान मुजावर,मनिषा धमोणे,इतिहास विभागप्रमुख डॉ . जांभूरे , डॉ . सर्जेराव जाधव ,डॉ.आहुजा, कु.संजश्री खोत, विरसेन साळोखे , प्रशांत आंबी शिवप्रसाद शेवाळे,धीरज कठारे, हरिष कांबळे आदी कॉलेज चे विद्यार्थी उपस्थित होते . सूत्रसंचालन कु.तेजस्विनी यादव व आभार कु.अमोल साळुंखे यांनी मांडले ..